नमस्कार


प्रेरणा आणि प्रोत्साहन मानवी जीवनासाठी शक्तिवर्धकाचे कार्य करतात. योग्य वेळी योग्य व्यक्ती व तितक्याच योग्य संस्था द्वारा मिळालेली प्रेरणा, पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडून अलौकिक कार्य घडवून आणू शकते. पुरस्कार म्हणजे अंगीकृत कार्याला, अंगभूत कलागुणांना समाजाकडून मिळालेली पोचपावती असते. ज्या क्षेत्रात विषयाशी आपली बांधिलकी आहे त्या बांधिलकीवर लोकमान्यता व राज्यमान्यतेची गौरवमुद्रा उमटणे म्हणूनच फार समाधान प्राप्त करून देणारे असते. मानसन्मान, गौरव, पुरस्कार, सत्कार यांचे महत्व नसून त्यातून मिळणा-या प्रेरणेचे आणि प्रोत्साहनाचे आहे.
कारण पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. व्यक्तींच्या गुणांची कदर केल्याने कुटुंब मजबूत होते, समाज कार्यप्रवण होते व राष्ट्र खंबीरपणे उभे राहते. त्यामुळे राष्ट्रातील गुणीजनांची कदर करणे हा समाजजीवनाचा अत्यावश्यक कर्तव्याचा भाग बनतो. गुणवत्तेबद्दल आदर असणा-या आणि गुणांची कदर करणा-या समाजातच ख-या अर्थाने सांस्कृतिक, वैचारिक व भावनिक संपन्नतेची सदृढतेची मौलिक बीजे रुजतात. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातील गुणिजनांचे कौतुक करणे हि केवळ शासनाची जबाबदारी नाही तर या राष्ट्राबद्दल महत्व असणा-या सच्च्या राष्ट्रभक्तीची ती खरी ओळख आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील चांगुलपणा जाहीरपणे गौरविण्याची मानसिकता सर्व घटकांना सामावून घेता येणे शक्य होते.

ताज्या घडामोडी

निवेदन

 • प्रति वर्षी प्रमाणे राज्यस्तरीय संकेत पुरस्कार सन २०१५ प्रदान करण्यात येणार आहेत.
 • काव्यलेखन, निबंधलेखन आणि कथालेखन स्पर्धा
 • अधिक माहितीसाठी

  अभिप्राय

  संकेत प्रतिष्ठान स्थापना

  राष्ट्र ऐक्यासाठी कलोपासना हे ब्रीद ठरवून संकेत कला क्रीडा अकॅडमीची स्थापना १९९६ साली विश्‍वासराव शंकरराव पवार यांनी कर्वेनगर गल्ली न. २ येथील श्री अनंतराव खाटपे यांच्या अध्यक्षतेखाली केली.


  अधिक माहितीसाठी ..

  ध्येय आणि धोरणे

  संकृतीचे संचयन, संवर्धन, संक्रमण करून उपजत कला गुणांना संधी देणारी संस्था. केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारी संस्था. तमसो मा ज्योतीर्गमय या उक्ती प्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी प्रकाशदीप संस्था

  अधिक माहितीसाठी ..

  नियमावली

  राज्यस्तरीय संकेत पुरस्कार सूचना व नियम-
  संस्थेने ठरविलेल्या पुरस्कार प्रस्ताव फॉर्मवरच आपली माहिती नमूद करावी. अर्जासोबत शिफारस पत्राची आवश्यकता नाही, कोणतीही शिफारस स्विकारली जाणार नाही.

  अधिक माहितीसाठी ..

  संकेत पुरस्कार प्राप्त विजेते

  • Download Form